शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

दलित महासंघाचा तिरडी मोर्चा : सांगलीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:03 IST

तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्दे‘सिव्हिल’मध्ये जिवंत रुग्णाला मृत ठरविल्याचा निषेध

सांगली : तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. या प्रकाराला डॉक्टरच जबाबदार असून, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.अविनाश बागवडे शासकीय रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून उपचार घेत आहेत.

चार दिवसांपूर्वी त्यांच्याशेजारील एका बेवारस रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे बागवडे यांनाच मृत जाहीर करण्यात आले. पण प्रत्यक्षात बागवडे जिवंत आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात शेजारील बेवारस रुग्णाचा मृतदेह देण्यात आला होता. बागवडे मृत झाल्याचे प्रमाणपत्रही दिले होते.

याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाने मोर्चा काढला. मुख्य बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चास प्रारंभ झाला. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता या मार्गावरुन हा मोर्चा रुग्णालयावर आला. पोलिसांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन आंदोलकांना आत येण्यास अटकाव केला. तिरडीवर जिवंत व्यक्तीस बसविण्यात आले होते. त्याच्या अंगावर पांढरे कापड, गुलाल टाकून पुष्पहार अर्पण केला होता. रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनीता कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. उपाध्यक्ष दिलीप शेलार, उषाताई मोहिते, संपर्क प्रमुख महेश देवकुळे, राकेश चंदनशिवे, नेताजी मस्के, सुनील वारे, अजित आवळे, अभिमन्यू वाघमारे, विठाताई देवकुळे, राजीव खैरे, माया कांबळे, अनिल थोरात आदी मोर्चात सहभागी झाले होते.

रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांशी आंदोलकांनी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासाने घडलेल्या प्रकराची सखोल चौकशी केली आहे. चार कर्मचाºयांना दोषी धरुन त्यांच्या तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात बदल्या केल्या आहेत. अजूनही काही कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. त्यांची चौकशी करुन लवकरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.सीआयडी चौकशीची मागणीतत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भागवत गेल्या दहा महिन्यांपासून सेवेत नाहीत. तरीही मृत्यू प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रांवर अजूनही त्यांच्या नावाचा गैरवापर सुरु आहे. याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चातील प्रमुख मागण्या...बेवारस मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणेंसह वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करावे.बागवडे यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर करावी.केसपेपर शुल्क वार्षिक दहा रुपये ठेवावे.

 

टॅग्स :SangliसांगलीMorchaमोर्चाDeathमृत्यू